विमानतळासाठी आम्ही सर्व एकत्र, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना भेटणार – आमदार महेश लांडगे
पिंपरी चिंचवड : एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा दोन दशकांपूर्वी करण्यात आली होती .पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही वर्षात होईल. आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, उद्योजक इ सर्वानाच्या आशा प्रज्वलित झाल्या होत्या. बृहनपुणेची लोकसंख्या 70 लाखाच्या पुढे आहे. ऑटोमोबाईल, आय टी, फायनान्स, एज्युकेशन, रिअल इस्टेट, ऍग्रो या सर्व क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर उलढालीच्या मोठ्या शहरातील नागरिकांना युरोप, अमेरिका, युरेशिया, दक्षिण पश्चिम आशिया या देशात जाण्यासाठी मुंबई हा एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 2007 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळासाठी निर्णय घेतला.
खेड मधील चाकण येथे विमानतळासाठी जागा निश्चित केल्या. अनेक उद्योग चाकण मध्ये आले. जमिनीचे भाव गगनाला भिडले. तेथून राजकीय विरोध सुरू झाला. प्रकल्प रद्द होऊन कोये, पाइंट, केदुर येथील जागा रद्द झाल्या आणि पुरंदरला विमानतळ होईल, असे वाटत असताना संरक्षण खात्याने परवानगी नाकारली आहे.
हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !
संरक्षण मंत्र्यांना भेटणार !
आमदार महेश लांडगे म्हणाले, वेगाने विस्तार आणि विकसित होत असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव मधील उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, परदेशी कंपन्यांतील प्रतिनिधी ई सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा विमानतळ खेड येथे व्हावा. मुंबई, लोहगाव येथील ताण कमी होण्यासाठी विमानतळ गरजेचा आहे. मी विविध पक्षातील लोकप्रतिनिधींना एकत्र करून एक प्रतिनिधीमंडळ घेऊन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना भेटणार आहे. प्रशासकीय स्तरावर केंद्र आणि राज्यसरकारच्या वरिष्ठ विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. सर्वांनी साथ द्यावी.
तळेगाव – चाकण – रांजणगाव येथील इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील २५ वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे. अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. आता सर्वांनी मतभेद विसरून जनतेची ही मागणी पूर्ण करू, असेही लांडगे म्हणाले.
हेही वाचा ! धक्कादायक ! अभिनेत्रीला वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून काढले अर्धनग्न फोटो, व्हायरल करायची दिली धमकी
विकासाच्या मुद्यावर सर्व एकत्र
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी व्यापक एकमत होईल. केंद्रसरकार आणि राज्य सरकारमध्ये विकासाच्या कोणत्याही योजनेसाठी मतभेद असू शकत नाही. लोकनेते शरद पवार, पालक मंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा विमानतळ होईल. खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकसभेमध्ये सरकारबरोबर समन्वयक म्हणून काम करतील. इथे आता कोणतेही मतभेद असणार नाहीत. आंतरराष्ट्रीय विमानतळा मुळे नव्या कंपन्या येतील, रोजगाराच्या संधी वाढतील.
आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढेल
पुणे शहर डॉ.किशोर खिल्लारे म्हणाले, पुण्याच्या नागरिकांचा परदेशाशी सर्वात जास्त संबंध आहे. उद्योजक, व्यापारी व शैक्षणिक कामासाठी पुणे – पिंपरी-चिंचवड मधून अनेक जणं आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हीटी नसल्याने मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करतात. त्यामध्ये भरपूर वेळ व पैसेही जास्त द्यावे लागते. तेव्हा सर्वांच्या सोयीसाठी पुणे परिसरात प्रस्तावित नविन आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर होणे आवश्यक आहे. बहुराष्ट्रीय उद्योग, शैक्षणिक अस्थापनातील कर्मचाऱ्यांना परदेशात जाण्यासाठी मुंबईला जावे लागते. कार्पोरेट जगतामध्ये वेळेला महत्व असते. हडपसर, फुरसुंगी, कात्रज पासून पुणे शहर विस्तारित होत आहे. चाकण विमानतळ सर्वांना सोयीचा होईल.
हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला
दोन घराआड एका कुटुंबातील मुलगा वा मुलगी हे परदेशात
निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक, टाटा मोटर्स, चिंचवडचे किरण येवलेकर म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये सध्या दर दोन घराआड एका कुटुंबातील मुलगा वा मुलगी हे परदेशात शिकायला किंवा नोकरीला आहे. येथून मुंबईला जाणे हे जितके त्रासदायक आहे,तितकेच वेळखाऊ आहे. या सर्व मुलांच्या व त्यांच्या परिवाराच्या दृष्टीनेही असे विमानतळ आवश्यक आहे. खरे तर नाशिक पासून मुंबई जरी जवळ असली, आता नाशिक पुणे सहा पदरी व वेगवान हायवे झाला असल्याने नाशिकहून खेड विमानतळ औद्योगिकदृष्ट्या सुद्धा नक्कीच जास्त उपयुक्त ठरू शकेल. सर्वच दृष्टीने अत्यंत मध्यवर्ती असे खेड विमानतळ असू शकेल, त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून, एक होऊन यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे भाग्य उजळेल
चिखली प्राधिकरण येथे राहणाऱ्या शैलजा कडुलकर म्हणाले, शहरातील अनेक मुले मुली परदेशात शिक्षण घेत आहेत. युरोप अमेरिकेत नोकरी करत आहेत. माझी मुलगी जर्मनी मध्ये शिक्षण घेत आहे. मुंबई विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहे. पुणे मुंबई हा प्रवास दगदगीचा आहे. या शहरातील नागरिकांना खेड येथे विमानतळ झाल्यास सोयीस्कर होईल. पुणे औद्योगिक क्षेत्रात चीन, जपान, जर्मनी, स्वीडन, अमेरिकी या देशातील कंपन्या आहेत. चाकण येथे विमानतळ झाल्यास युरोप, अमेरिका, आफ्रिका खंडातील सांस्कृतिक, व्यापारी, शैक्षणिक स्तरावर पिंपरी चिंचवड चे भाग्य उजळेल.
हेही वाचा ! 29 वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन राजस्थानमधील प्रतापगडात
कृषी उत्पादने सहज निर्यात करता येतील, कृषिविकासाला चालना मिळेल
बाबुराव घोलप महाविद्यालय सांगवीचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.वंदना पिंपळे म्हणाले, चाकण येथे विमानतळ लवकर व्हावा. पश्चिम महाराष्ट्रासह नगर, नाशिक, सोलापूर येथील प्रवाशांचा मुंबई विमानतळावर वाढलेला ताण कमी होईल. पुणे सह सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक, सांगली, सोलापूर येथील शेतकऱ्यांचा कृषीमाल परदेशात निर्यात करण्यासाठी कार्गो विमानांची सेवा सहज उपलब्ध होईल. परदेशी उद्योजक, अधिकारी, प्रतिनिधी यांचा मुंबईहून पुण्यात येणारा वेळ वाचेल. येथील विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल. शिरूर, रांजणगाव, मावळ येथे नवी विकास केंद्रे उदयाला येतील.
– क्रांतिकुमार कडुलकर