Saturday, October 12, 2024
Homeजिल्हामहाज्योती बचाव कृती समितीचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना विविध मागण्यांचे निवेदन

महाज्योती बचाव कृती समितीचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना विविध मागण्यांचे निवेदन

औरंगाबाद : महाज्योती बचाव कृती समितीच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना महाज्योती संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती, एमपीएससी व यूपीएससीचे ऑनलाइन चालू असणारे क्लासेस ऑफलाइन करून, त्यांना स्टायपेंड देण्यात यावे. एम.फील व पीएच.डी करणार्‍यांना मूळ नोंदणी तारखेपासून छात्रवृत्ति (फेलोशिप) देण्यात यावी व  महा ज्योतीने अपात्र केलेले विद्यार्थी सारथी प्रमाणे अपात्र विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी राज्यमंत्री कराड यांनी महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी महाज्योती बचाव कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण, सदस्य विठ्ठल नागरे, महेंद्र मुंडे व गजानन पालवे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय