Credit : ANI |
मुंबई : “प्रसिद्ध कथ्थक नृत्यकलावंत, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच निधन झाल आहे. ते ८३ वर्षांचे होते. काल मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं.
रात्री अचानक पंडित बिरजू महाराज यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला होता.
तरुण कलावंतांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या, त्यांच्यासाठी मार्गदर्शक, दीपस्तंभाचं काम त्यांनी केलं. कथ्थक नृत्यकलेला देशात, सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. कोट्यवधी रसिकांना मनमुराद आनंद दिला.
दरम्यान, पंडित बिरजू महाराजांना आदर, मान-सन्मान, लोकप्रियता मिळवून देण्या काम महाराष्ट्रानं सातत्यानं केलं. महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता बाळगणारे, पश्चिम बंगालला आई, महाराष्ट्राला वडील मानणारे ते कलावंत होते. पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला आहे. पंडितजींच्या कुटुंबियांच्या, त्यांच्या कोट्यवधी रसिकांच्या दु:खात मी देखील सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा ! ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे
हेही वाचा ! बँक ऑफ बडोदाच्या (BOB) विविध पदांच्या एकूण १९८ जागा
ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या एकूण ५७० जागा