येवला : कोरोना काळात अल्प मानधन वर कार्यरत आरोग्य विभागातील आशा व गट प्रवर्तक चे प्रेरणादायी आहे. त्याला सलाम करतो असे प्रतिपादन येवला तालुका चे तहसीलदार प्रमोद हिले यांनी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना येवला तालुका मेळाव्यात शासकीय विश्रामगृह येवला येथे केले.
आशा व गट प्रवर्तकांना ग्रामपंचायत पातळीवर कोरोना प्रोत्साहन भत्ता बाबत गट विकास अधिकारी व पालकमंत्री छगन भुजबळ यांना ही या संदर्भात अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले. या प्रसंगी तालुक्यातील आशा व गट प्रवर्तकांचा कोरोना योध्या म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, किसान सभा वतीने सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, येवल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, भाकपचे नेते कॉम्रेड भास्कर शिंदे, भाकप येवला सचिव कॉम्रेड बशीर पठाण होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक) होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी आशा व गट प्रवर्तक च्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले. आशा व गट प्रवर्तकांना सन्मानाची वागणूक सर्वानी दिली पाहिजे. तालुक्यात आशा व गट प्रवर्तक च्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मदत करेल असे आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोरोना काळात मी स्वतः गावपातळीवर आशा व गट प्रवर्तकांचे काम पाहिले आहे. देश घाबरलेला असतांना रुग्णांना बळ देण्याचे काम आशा नी केले आहे. आज आमच्या हस्ते सन्मान करतांना आनंद होतो आहे.
संघटना चे राज्य अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू देसले यांनी गेली दोन वर्षे आशा व गट प्रवर्तकांनी जीवावर उधार होऊन काम केले आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटना ने घेऊन देशात कार्यरत 7 लाख आशा व 75 हजार गट प्रवर्तकांचा सन्मान केला आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत नि आशा व गट प्रवर्तकांना कोरोना प्रोत्साहन देण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र जून2021 मध्ये काढले आहे. त्याची अंमलबजावणी मात्र अल्प प्रमाणात होत आहे. ती सर्व ठिकाणी करून आशा व गट प्रवर्तक चा गौरव ग्रामपंचायत नि करावा यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सहकार्य करावे असे असे आवाहन केले.
राज्य सरकारने कामाची दखल घेऊन दोन वेळा संप करून मानधन वाढ केली आहे. मात्र राज्य सरकार नि दरमहा मानधन ती देण्यासाठी वार्षिक तरतूद करावी. यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने 2018 पासून आशा व गट प्रवर्तकांचे मानधन वाढ केलेली नाही. सद्या आशा व गट प्रवर्तकांच्या कामाचे कौतुक केले जाते. मात्र कौतुक ने पोट भरत नाही. प्रचंड महागाई वाढत आहे. 1000 रुपये ला घरगुती गॅस मिळत आहे तर पेंट्रोल डिझेल दरवाढ मुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्या मुळे मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. केंद्र सरकारने आशा व गट प्रवर्तक चा सन्मान किमान वेतन21 हजार रुपये लागू करून करावा. अन्यथा तीव्र आंदोलन येत्या काळात करू असा इशारा दिला.
देशात एकमेव अशी योजना आहे की काम शासनाचे करायचे फक्त प्रवास भत्ता वर ती म्हणजे आरोग्य अभियानातील गट प्रवर्तकांचे पद आहे. उच्चशिक्षित महिला असून ही प्रवास भत्ता वर केंद्र सरकार राबवून घेत आर्थिक शोषण केंद्र सरकार करीत आहे. महिलांचा सन्मान करणारे शासनाचं असं विना वेतन राबवून घेत आहे. या विरोधात गट प्रवर्तकांच्या मागण्यासाठी स्वतंत्र आंदोलन देश व राज्य पातळीवर करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.
तालुक्यात व जिल्ह्यात आशा व गट प्रवर्तकांना सन्मानाची वागणूक देत नसेल. अपमान करत असतील तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. मान्यवरांच्या हस्ते सन्मान व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. राजू देसले यांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज ची प्रतिमा देऊन गट प्रवर्तकांना व आशा ना मानधन वाढ मिळवून दिल्याबद्दल केला.
मेळावा संपल्यावर गट विकास अधिकारी अन्सारी यांना संघटना चे राज्य अध्यक्ष राजू देसले भेट घेतली व येवला तालुक्यात आशा व गट प्रवर्तकांना प्रोत्साहन भत्ता अल्प प्रमाणात ग्रामपंचायत अंमलबजावणी करत आहेत ती सर्व तालुक्यात व्हावी असे आवाहन केले. त्या वरती सर्व तालुक्यातील ग्रामसेवक सरपंच शी बोलत आहे. सर्वत्र अंमलबजावणी होईल याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गट प्रवर्तक सुवर्णा बैरागी यांनी केले तर आभार सुनंदा परदेशी यांनी केले.
याप्रसंगी स्वाती चव्हाण, मनीषा राजगुरू, निशिगंधा पगारे, सुरेखा गायकवाड, वर्षा भावसार, शारदा पुंड, सुनीता सोनवणे, मंगल पगारे, लंका राऊत, रंजना कदम, बलुबाई जगताप, सुजाता जोगदंड, सुनीता बैरागी, प्रगती आहेर, वैशाली त्रिभुवन, सविता अहिरे, प्रिया कुलकर्णी तालुक्यातील सर्व गट प्रवर्तक, आशा उपस्थित होत्या.