पिंपरी चिंचवड : माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री व भाजपाचे नेते स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड भाजपा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात स्व. गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी प्रचंड संघर्षातून आपले नेतृत्व उभे केले. लोकांमध्ये वावरणारा नेता अखेरपर्यंत लोकांसाठी जीवन जगला. त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा आम्हा भाजपा कार्यकर्त्यांना कायम मिळत राहील.
यावेळी प्रदेश चिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस विजू फुगे, राजू दुर्गे, दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक माऊली थोरात, सुजाता पालांडे, तुषार हिंगे, उपाध्यक्ष कमल मलकानी, अण्णा गर्जे, चिटणीस गणेश ढाकणे, प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, वैशाली खाडे, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, अजित कुलथे आदी उपस्थित होते.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर