नांदेड : ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील 4 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. नांदेड – देगलूर मार्गावरील शंकरनगरजवळ काल रात्री 9 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
शंकरराव जाधव, महानंदा जाधव, धनराज जाधव आणि कल्पना शिंदे अशी मृतांची नावे आहेत. तर स्वाती पाटील ही गंभीर जखमी असून तिच्यावर नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायगाव तालुक्यातील (तमा) टाकळी येथून केरुर येथे कारने पाचही जण जात होते. त्यावेळी देगलूरकडून येणारा ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला.
अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा, मुलगी ठार झाली. तर विवाहित असलेली नात स्वाती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात स्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती