Saturday, December 21, 2024
Homeराज्यमोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ढकलल्या पुढे, वाचा काय आहे...

मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ढकलल्या पुढे, वाचा काय आहे प्रकरण !

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आयोगाने गट ब विभागाची मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहेत. या परीक्षा 29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणार होत्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासताना चूक झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने 86 विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असा निर्णय दिला.

MPSC च्या विरोधात न्यायालयात गेलेल्या 251 विद्यार्थ्यांना दिलासा तर 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना फटका

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढत म्हटले आहे कि, राज्यातील विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकाच्या आधारे परीक्षा आयोजित करणे तसेच, परीक्षेच्या आयोजना संदर्भातील इतरही संबंधित बाबींची व्यवस्था करणे अल्पकालावधीत शक्य होणार नसल्याने दि. २९ जानेवारी, दि. ३० जानेवारी, दि. ५ फेब्रुवारी व दि. १२ फेब्रुवारी रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

तसेच, न्यायालयीन कामकाजामुळे अंतिम निर्णय येईपर्यंत परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. परीक्षेच्या आयोजना संदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येऊन परीक्षेचे सुधारित दिनांक निश्चित करण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

मोबाईल खरेदी करताय ? ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये स्वस्त फोन, 6,000 mAh बॅटरी पाच दिवस चालणार चार्जिंगविना

संबंधित लेख

लोकप्रिय