Saturday, October 5, 2024
Homeराज्यMPSC च्या विरोधात न्यायालयात गेलेल्या 251 विद्यार्थ्यांना दिलासा तर 4 ते 5...

MPSC च्या विरोधात न्यायालयात गेलेल्या 251 विद्यार्थ्यांना दिलासा तर 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना फटका

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. यातील जवळपास 86 मुलांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्याचा निर्णय आज मुलांच्या बाजुने लागला. न्यायालयाने या 86 मुलांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले हाेते.

यामुळे उर्वरित 400 विद्यार्थ्यांनी मुंबई, औरंगाबाद, नागपूर या खंडपीठात MPSC संयुक्त पूर्व परीक्षा PSI-STI 2020 मध्ये मुख्य परीक्षेत बसू देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल लागला आहे. 

मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ढकलल्या पुढे, वाचा काय आहे प्रकरण !

आता मुंबई उच्च न्यायालय (161), औरंगाबाद (88) आणि नागपूर खंडपीठाने 9 असे 258 विद्यार्थ्यांना आजच्या सुनावणीत पात्र ठरवले आहे. आता एकूण 344 विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरले आहेत. आयोगाच्या अन्यायाविरोधात राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवत न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय ठरला. 

त्यामुळे औरंगाबाद, मुंबई, नागपूर खंडपीठाचा निकाल विद्यार्थांच्या बाजूने लागला आहे. आयोगाने 4 थी उत्तरपत्रिका प्रकाशित करावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे ही मागणी केला जात आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

संबंधित लेख

लोकप्रिय