वडवणी (लहु खारगे) : वडवणी नगरपंचायत निवडणुकीत बहुमताने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत शहर बचाव आघाडीच्या गटनेतेपदी युवा नगरसेवक अस्लम कुरेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
वडवणी नगरपंचायत निवडणुकीत बन्सी मुंडे, किस्किंदा दिनकरराव आंधळे, वंदना जगताप, मिनाक्षी शिंदे, द्रौपदी वाघमारे, नेहा आळणे, रंजना डिगे, उषा घाडगे, अस्लम कुरेशी हे विजयी शिलेदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत शहर बचाव आघाडीच्या माध्यमातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले नगरसेवक आहेत. तसेच, बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आगामी सत्तास्थापनेच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत शहर बचाव आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची स्थापना करण्यात आली असून यावेळी गटाचा प्रमुख म्हणून सर्वानुमते शहरातील प्रभाग क्रमांक ९ चे सलग दुसऱ्यांदा विजयी युवा नगरसेवक अस्लम अन्सार कुरेशी यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला कदापी तडा जावू देणार नाही – अस्लम कुरेशी
ऑक्टोपस; अवकाशातून आलेला ‘एलियन’ जीव?
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार केशव आंधळे, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे व बीड जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती जयसिंग सोळंके यांच्या सर्वसंमतीने व आदेशानुसारच वडवणीचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत शहर बचाव आघाडीचाच होणार असून वरील वरिष्ठ ठरवतील तोच नगराध्यक्ष सर्वांना मान्यही असणार आहे.
कोणी कितीही वल्गना केल्या तरी वडवणी नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पुरस्कृत शहर बचाव आघाडीचीच सत्ता बहुमताने स्थापन झालेली असून लवकरच सर्वानुमते नगराध्यक्षाचीही निवड करुन वडवणीकरांच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द आहोत असेही यावेळी नवनिर्वाचित गटनेते अस्लम कुरेशी म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये विविध पदांच्या ७२ जागा!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीला योग्य तो न्याय देवून त्यांच्या विश्वासाला आयुष्यात कदापी तडा जावू देणार नसल्याचे मनोगत नवनिर्वाचित गटनेतेपदी निवडीनंतर गटनेते अस्लम कुरेशी यांनी व्यक्त केले.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा