मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, परंतु या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नामुळे पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये विविध पदांच्या ७२ जागा, आजच अर्ज करा!
ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. 8 फेब्रुवारीला ओबीसी प्रश्नाची सुनावणी होणार आहे, त्यावेळी मागासवर्ग आयोगाचा प्राथमिक अहवालाचा हवाला देत अंतिम अहवालापर्यंत निवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती सरकारकडून केली जाऊ शकते. त्यामुळे मुंबई, पुण्यासह 10 महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांची मुदत सन 2020 मध्येच संपली असून सध्या तेथे प्रशासकीय राजवट आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी -चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपतो आहे. मात्र ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नामुळे निवडणुका लांबणीवर पडल्यास प्रशासक नेमला जाऊ शकतो.
कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची का असतात?
गेल्याच वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा करून मुदत संपलेल्या महापालिकेवर प्रशासकच नियुक्त केला जाईल आणि पालिकेतील नगरसेवकांना पाच वर्षांपेक्षा अधिक मुदतवाढ दिली जाणार नाही अशी तरतूद केली आहे.