पिंपरी चिंचवड : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कै.गजानन चिंचवडे (52) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे.
शहरातील विविध कामगार संघटना, श्रमिक संस्था संघटनांशी त्यांचा जनसंपर्क खूप मोठा होता. तरुण वयात त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात लोकाभिमुख कार्य केले होते.
यंत्रणेची बेपर्वाई आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष; हेच बांधकाम कामगारांच्या मृत्युचे खरे कारण – सिटू
प्रा.रामकृष्ण मोरे यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती.
– क्रांतिकुमार कडुलकर
ब्रेकिंग : पुणे जिल्ह्यातील शाळा “या” तारखे पासून पूर्णवेळ सूरू होणार
कामगारांचा जीव स्वस्त झाला ? कामगार मृत्यू होणारे प्रकल्प पाच वर्षासाठी बंद करा – काशिनाथ नखाते