Sunday, December 22, 2024
HomeNewsरताळे खाणे थंडीमध्ये ठरते फायदेशीर !

रताळे खाणे थंडीमध्ये ठरते फायदेशीर !

 

पुणे : हिवाळ्यात गाजर, हरभरे, रताळे मुबलक प्रमाणात मिळू लागतात. रताळ्यांचे सेवन या काळात आरोग्यासाठी लाभदायकच ठरते. मुलांच्या शारिरीक विकासासाठी रताळी गुणकारी असतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जाणून घ्या ! कधीही खराब न होणारा हा अन्न पदार्थ

रताळ्यात कॅल्शियम, झिंक, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस पोटॅशियम आणि सोडियम मोठ्या प्रमाणात असते. ही सर्व खनिजे व पोषक घटक मुलांच्या वाढीसाठी लाभदायक असतात. 

वाचा ! आपल्याला का वाजते थंडी?

याशिवाय रताळ्यात ‘ए’, ‘सी’, ‘ई’, ‘बी-6’ आणि ‘बी-9’ ही जीवनसत्त्वेही असतात. ‘जीवनसत्त्व ए एन्थोसायनिन’ रताळ्यात असते व त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ‘बी-6’ या जीवनसत्त्वामुळे मुलांच्या मेंदूचा विकास चांगला होण्यास मदत मिळते.

आता खाता येणार रंगीत बटाट्याची भाजी; रोगप्रतिकारक क्षमताही वाढणार, नवे वाण विकसित

संबंधित लेख

लोकप्रिय