कष्टकरी जनता आघाडीची नविन ठेका रद्द करण्याची केली मागणी; महापालिकेवर आंदोलन करत निषेधाच्या घोषणा दिल्या
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानरपालिका व ठेकेदाराकडून साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या बाबत सातत्याने निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. त्याविरोधात संतप्त होत सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर आंदोलन छेडले. या वेळी ठेकेदर महापालिकेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळीकष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सफाई कामगार संघटनेच्या नेत्या मधुरा डांगे, कष्टकरी जनता महीला आघाडीच्या मलानताई गवई, गौरी प्रमोद सेलर हे उपस्थित होते.
संजय राऊतांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भुकंप, केले गंभीर आरोप
यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १६०० महिला व पुरुष सातत्याने रस्ते झाड लोड साफसफाई व इतर कामे कंत्राटी पद्धतीने करत आहेत, गेले दहा ते पंधरा वर्षापासून ही कामे सातत्याने सुरू आहेत यात ठेकेदार बदलत असून मूळ कामगार मात्र तेच आहेत गेले चार वर्षापासून प्रभाग पद्धतीने अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह अशा प्रकारे प्रभाग विभाग सहित ठेकेदारांना कामे देण्यात आले आहेत.
सहा ठेकेदारांची मुदत संपली असून मनपाच्या वतीने नवीन निविदा राबून नव्याने साफसफाई कामाचा ठेका देण्यात आला आहे. अर्धवेळ व पूर्ण वेळ कामगार लावून व मशीनद्वारे साफसफाईचा ठेका देण्यात आला आहे. नवीन देण्यात आलेल्या ठेकेदारी मध्ये कामगार कायद्याचा भंग झाला असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.
कर्नाटक हिजाब बंदी प्रकरण : राज्यकर्ता पक्षच तेथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे, माकपचा आरोप
या नवीन ठेकेदार पद्धतीमुळे कामगारांचे शोषण आर्थिक पिळवणूक होत आहे. साफ सफाई कामगारांच्या बचत खाते विभाग २० ते ३० व्यक्ती कामे विभागून देण्यात यावे अशी आमची आग्रही भूमिका आहे. याबाबत वेळो वेळी मनपा आयुक्त यांच्याकडे पाठपुरवठा करण्यात आला आहे. परंतु याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. जो पर्यंत हा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत लढा देऊ, असे बाबा कांबळे म्हणाले.
– क्रांतिकुमार कडुलकर