बाल्टिक सागरात रशियाचा वेढा
किव्ह : युक्रेनच्या मुद्यावरून अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये गंभीर तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव दूर करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल फोनवरून तासभर चर्चा केली. चर्तेतून तोडगा निघाला नाही.
अमेरिका, इंग्लंड, इस्रायल सह युरोपियन देशांनी आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आज आदेश जारी केले आहेत.
मित्राला सोडविण्याकरिता जात असताना भीषण अपघात, तिघे जागीच ठार
रशियन सरकारच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या भूमीवर सागरी हद्दीत तसेच बेलारूस मध्ये आमचा युध्दाभ्यास करत आहोत. आम्ही युक्रेन, नाटो संदर्भात सुरूवातीला सामरिक सुरक्षेच्या संदर्भात भूमिका सुरवातीला स्पष्ट केलेली आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय लष्करी तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, भौगोलिकदृष्ट्या युक्रेन युरोपीय महासंघ आणि रशिया या दोघांशीही जोडलेला आहे. विशेषतः रशियासोबत युक्रेनचे दृढ सांस्कृतिक बंध आहेत. रशिया आणि युक्रेन यांचा एकमेकांशी व्यापार मोठा आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर उत्तर अटलांटिक सैन्य संघटना (NATO) विसर्जित करावी अशी रशियाची भूमिका होती. मात्र अमेरिकेने युरोपवर प्रभुत्व अबाधित ठेवून रशिया विरोधात सैन्य शक्तीचा दबाव ठेवला आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विविध पदांच्या एकूण ३५४ जागा आजच अर्ज करा!
अमेरिकन गुप्तचरामार्फत जॉर्जिया, बेलारूस, युक्रेन, कझाकिस्तान इ देशात रशियाविरुद्ध कारस्थाने केली जातात. युक्रेनच्या सत्ताधार्यांना हाताशी धरून युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देण्यामागे अमेरिकेचा हात आहे.
जर्मनी आणि रशियातील 1700 किमीची नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाईप लाईन पूर्ण झाली आहे. अमेरिकेचा याला विरोध आहे. युरोपियन देशांमध्ये यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनमधून रशियन सरकारच्या बलाढ्य कंपनीचा नैसर्गिक वायू पुरवठा, प्रश्नावरून रशिया विरुद्ध अमेरिका संघर्ष दिवसेंदिवस चिघळत जात असून अमेरिका आणि अमेरिकेचे नाटोमधील सहकारी रशियाने युद्धाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे वाटत आहे.
राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण
वाटाघाटी फिस्कटल्यानंतर जो बायडेन म्हणाले की, आम्ही एका बलाढ्य सैन्याशक्ती समोर उभे आहोत. बीजिंग ऑलिम्पिक 2022 संपल्यावर रशिया युक्रेनवर हल्ला करेल असे वाटते. अमेरिकेने युरोप, पोलंड, मध्य आशियातील तळावरील सैनिक युक्रेन मध्ये पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मित्रराष्ट्र बेलारूस बरोबरच्या युद्धभ्यासात प्रथमच महाविनाशकारी विमाने, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, एस 400 प्रचंड लष्करी सामुग्री वापरली जात आहे. युरोपमधील प्रमुख राष्ट्रे युद्ध न होता तोडगा निघेल या आशेवर आहेत.