Sunday, December 22, 2024
Homeपर्यटनभंडारदरा, रतनगड, घाटघर, सांदण दरी पर्यटन विकासाच्या दिशेने वाटचाल

भंडारदरा, रतनगड, घाटघर, सांदण दरी पर्यटन विकासाच्या दिशेने वाटचाल

भंडारदरा : अकोले तालुक्यातील  सह्याद्री च्या चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणार्या  घाटघर घाटणदेवी कोकणकडा, साम्रद सांदनदरी परिसर निसर्ग पर्यटनासाठी वन्यजीव व स्थानिक वन समित्यांकडून गुजरात मधील ‘सापुतारा’ सारखा विकसीत होत असून येथील अभिजात निसर्ग पर्यटकांना सहल-सफरी साठी खुणावतोय.

सध्या या  स्पील वे भंडारदरा रतनगड साम्रद घाटघर पांजरे उडदावणे शेंडी या रिंगरोड परिसराला पर्यटकाची प्रथम पसंती आहे. तर भंडारदरा परिसरातील पर्यटनाचा आत्म असणाऱ्या विल्सन डॅम भिंत पायथ्याच्या बागेची प्रचंड दुरावस्था झाली असून बागेला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी सजग प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा निसर्गप्रेमींकडून होत आहे.

व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशल : गुगलचे खास Google Valentine’s Day 3D Puzzle डूडल पाहिलेत का?

“वन्यजीव कडून घाटघर कोकणकडा, साम्रद सांदन दरी, पांजरे बेट परिसर पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित केला जात आहे. त्यास जिल्हा नियोजन निधीची मदत होतेय. पांजरे बेट व घाटघर येथे अधिकृत बोटींगसाठी प्रयत्न सुरू आहे. वनपरिक्षेत्रात फिरण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते,तो निधी स्थानिक परिसर विकासासाठीच खर्च केले जातात.”

– गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक

वन्यजीव विभाग नाशिक 

कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य राजूर-भंडारदरा

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात जिल्हा नियोजन च्या निधीतून आकर्षक रंगसंगतीचे पॅगोडे, ओटे, वृक्षांपार, चिमकल्यासाठी सायकली खेळणी असा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास केला गेला आहे. हा परिसर आता सापुतरा या पर्यटन व्हॅली सारखा नटला आहे. त्यात कळसुबाई शिखरावर रोप वे होण्याचे संकेत मिळाल्याने आता पर्यटन व्यवसायास अधिक गती मिळणार आहे.

जिल्ह्याची चेरापुंजी असलेला घाटघर रतनवाडी पांजरे परिसर अभिजात निसर्गाचा ठेवा आहे. त्या ठेव्यास पैलू पाडून वन्यजीव विभाग येथील तरुणाईस पर्यटन व्यवसायाच्या मदतीने आर्थिक सबल करण्यासाठी पुढाकार घेत आहे. सादंन दरी परिसरात दोन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे झाल्याने वन्यजीव व पाळीव जनावरांचा पाणी प्रश्न मिटला असून पाळीव जणावरे आता सांदन दरी कडे फिरकत नसल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

विशेष लेख : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक पत्र प्रेमाला…

“धरण जलाशयात स्पील वे गेट  व भिंतीच्या डाव्या बाजूस जवळपास २५ नौका ( बोटी) होड्या अनाधिकृत व्यवसाय करत आहे. येथे पाणी पातळी जास्त खोल आहे. लाईफ सेव्हिंग जॅकेट वापरताना दिसत नाहीत, पर्यटकांच्या जीव सुरक्षिततेसाठी लाईफ सेंव्हिंग सेफ्टी वापरत नाहीत या बोटींग व्यवसाईकांना नोटीसा देवून स्थानिक पोलीसांना प्रशासनाला देखील  कळवले आहे. अभयारण्य क्षेत्र असल्याने बोटींग व्यवसायास मान्यता मिळण्यास अडचणी आहेत. अधिकृत बोटींग व्यवसाय सुरू झाल्यास संभाव्य जीवहाणीचा चा अनर्थ टळेल.”

– अभिजीत देशमुख, सहाय्यक अभियंता

भंडारदरा धरण शाखा, जलसंपदा विभाग अहमदनगर

वाचा ! आपल्याला का वाजते थंडी?

घाटघरचा कोकणकडा, घाटणदेवी टेबल लॅण्ड  व कोकणकडा, वाघतळ, घाटघर जल विद्युत प्रकल्पातील अप्पर डॅम, इकोसिटी, अमृतेश्वर मंदिर, पांजरे बेट ही या परिसरातील पर्यटनाची बलस्थाने विकसीत करण्यात आली आहेत. 

कोकण कड्यावरुन मावळता सुर्य पाहणे मनमोहक ठरत असुन पर्यटक तासंनतास रेंगाळु लागली आहेत. तर पांजरा बेट सनसेट पाॅईंट सागरात सुर्य डुंबतो याची आठवण करुन देणारा आहे. तर कोकणकड्याच्या उजव्या हाताला अंलंग, कुलंग व मलंग गड असुन पर्यटक आता गडासह सेल्फी घेताना दिसताहेत.

भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!

“भंडारदरा धरण, रंधा धबधबा घाटघर, निळवंडे धरण या प्रमुख जलाशयाजवळ पर्यटकांच्या जीव सुरक्षिततेसाठी जीथे पाण्याची पातळी ची खोली व प्रवाह जास्त आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यात  पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी गर्दी करतात व पाण्याचा खोलीचा अंदाज व प्रवाहाचा वेग न समजल्यामुळे दरवर्षी एक दोन पर्यटकांना जीव गमवावा लागतो. त्या दृष्टीने सुरक्षा कर्मचारी जीवरक्षक ( लाईफगार्ड ) तैनात करण्यात यावेत.”

– डॉली डगळे

सामाजिक कार्यकर्त्या अकोले तालुका

विशेष लेख : भारत स्वस्त मजुरांची अस्वस्थ बाजारपेठ

दुसरीकडे भंडारदरा धरणाच्या भिंत पायथ्याशी असलेल्या बागेची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तसेच जलाशयात जवळपास २५  प्रवासी होड्या  बेकायदेशीर नौकाविहार करत आहेत. पर्यटकांकडून ५०० ते १२५० रूपये एका फेरीचे उकळले जात आहेत. नौकाविहार करत आसाताना पर्यटकांच्या जीव सुरक्षिततेसाठी कुठलेही सेफ्टी साहित्य, लाईफ सेव्हिंग जॅकेट वापरताना दिसत नाही, आपत्कालीन परस्थिती मध्ये लाईफ रिंग,रेस्क्यू ट्युब उपलब्ध नाहीत. या नौकाविहारातून धोका संभावतो. येथे बोटींग क्लब स्थापन करून अधिकृत बोटींग व्यवसाय सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय