Tuesday, July 23, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकारची मोठी कारवाई, आणखी ५४ चीनी ॲप्सवर बंदी

केंद्र सरकारची मोठी कारवाई, आणखी ५४ चीनी ॲप्सवर बंदी

Photo : ANI Twitter

नवी दिल्ली : भारत सरकारने पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही चीनी ॲप्सवर बंदी घातल्याचे समोर आले आहे. यावेळी सरकारने ५४ मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. 

केंद्र सरकारने सर्वात पहिल्यांदा जून २०२० मध्ये भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत देशातील चीनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. २०२० पासून एकूण २२४ ॲप्सवर बंदी घातल्यानंतर आता पुन्हा एकदा धोकादायक असणाऱ्या ५४ चीनी ॲप्सवर सरकारने बंदी घातली आहे.

विशेष लेख : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक पत्र प्रेमाला…

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या ॲप्समध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock आणि Dual Space Lite यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे. 

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

लोकप्रिय मोबाईल गेम गरेना फ्री फायर (Garena Free Fire) १२ फेब्रुवारीपासून गूगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर दिसत नाही त्यामुळे या देखील अॅपवर सरकार बंदी घातल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, भारत सरकारने लोकप्रिय गेमिंग ॲप्स PUBG सह Tiktok, UC Browser, Share It, Hello, Likee, We Chat, Beauty Plus या लोकप्रिय ॲप्सवर बंदी घातली होती. 

शिवभोजन केंद्रात गैरप्रकार आढळल्यास कारवाई होणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय