Monday, December 23, 2024
Homeजिल्हावृद्ध महिलेच्या १ लाख ४० हजार किमतीच्या शेळ्या चोरणारा भामटा अटकेत -...

वृद्ध महिलेच्या १ लाख ४० हजार किमतीच्या शेळ्या चोरणारा भामटा अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आंबेगाव : शेळीपालन करणाऱ्या वृद्ध महिलेच्या विविध जातीच्या रुपये 1 लाख 48 हजार किमतीच्या शेळ्या चोरणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

या प्रकरणी घोडेगाव पोलिस स्टेशनमध्ये कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुंदाबाई लुमाजी भालचिम वय ७२ वर्ष रा.मेनुंबरवाडी आसाने, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या १५ शेळ्या चोरून नेल्या होत्या.

पेसा क्षेत्रातील अवैध माती उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी

वृद्ध महिलेच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेळ्या चोरीस गेल्याने गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करण्याच्या सुचना वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.  

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर आरोपीचा घोडेगाव भागात शोध घेत असता गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दीपक साबळे यांना बातमी मिळाली की, सीताराम खेमा भालचिम रा. नानावडे ता. आंबेगाव जि. पुणे हा चाकण येथील बाजारात शेळ्या विकण्यासाठी गेला होता. 

व्हिडिओ : अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी शब्द पाळला, “दोन्ही हात सोडून अख्खा घाट बैलजोडीसमोर घोडेस्वारी”

भालचिम याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या शेळ्या नसताना तो विक्रीसाठी शेळ्या घेऊन गेल्याने त्याच्यावर संशय बळावळा. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नानावडे या ठिकाणी रवाना झाले. त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता पोलिसांची चाहुल लागताच घराचे बाजूस असलेल्या जंगलात तो पळून जाऊ लागला पण गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. 

गुन्ह्याविषयी चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने गुन्ह्यामध्ये चोरलेल्या शेळ्या ह्या चाकण च्या बाजारात विकल्याची कबुली दिली. त्यापैकी तीन शेळ्या जुन्नर येथील एका व्यापाऱ्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपास करणे कामी घोडेगाव पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने द्राक्ष किंग 2022 चे परीक्षण सुरू

ही कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या सूचनेनुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, पोलिस नाईक, संदिप वारे, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नवले, प्रसन्न घाडगे,  मुकुंद कदम, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

LIC – IPO : मोदी सरकार सोन्याच अंडं देणारी कोंबडी विकत आहे, कर्मचारी संघटनांचा आरोप

संबंधित लेख

लोकप्रिय