बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्राच्या वतीने शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनाच्या निमित्ताने तसेच दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संयुक्तरीतीने ता. २० फेब्रुवारी, (रविवारी) आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे होणार आहे.
यानिमित्ताने होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. शंकर अंकुश, परांडा, प्रा. डॉ. दत्ता घोलप, सोलापूर विद्यापीठ, प्रा. तानाजी ठोंबरे, कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारणी सदस्य तर कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय उद्धवराव पाटील, शेकापा नेते उस्मानाबाद हे चर्चा सत्रात भाग घेणार आहेत.
बार्शीतील नागरिक, कामगार, विद्यार्थी, युवक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, नेते यांनी या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रवीण मस्तुद यांनी केले आहे.