Saturday, October 5, 2024
HomeनोकरीRBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

RBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

 

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एकूण 950 सहाय्यक पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.

आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2022 आहे. पूर्वपरीक्षा 26मार्च आणि 27 मार्च रोजी घेतली जाईल.

पात्रतेच्या अटी 

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान

50% गुणांसह असणे अनिवार्य आहे. ओबीसी, एससी आणि एसटीसाठी 50 टक्क्यांची अट नाही.

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे

1 फेब्रुवारी 2022 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 फेब्रुवारी 1994 पूर्वी झालेला नसावा आणि 01 फेब्रुवारी 2002 नंतर झालेला नसावा. SC आणि ST साठी 5 वर्षांची आणि OBC साठी 3 वर्षांची सूट दिली जाईल.

व सुरुवातीचा किमान मूळ पगार रु 20,700 प्रति महिना,महागाई भत्ता नियमानुसार वेतनश्रेणी 

यानंतर 20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 ची वेतनश्रेणी असेल. आणि इतर भत्ते मिळतील.

या नियुक्तीसाठी उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षांमधून जावे लागेल. प्राथमिक परीक्षा,

मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).

प्राथमिक परीक्षा 100 गुणांच्या 100 प्रश्नांसह एक तासाची असेल.

यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातील.

प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील.

मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे मिळतील.

यामध्ये रिझनिंग, इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून 40-40 प्रश्न विचारले जातील.

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.

मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी (LPT) मध्ये बसावे लागेल. (एलपीटी चाचणी संबंधित भागात बोलल्या जाणार्‍या स्थानिक भाषेत असेल.)

ऑनलाइन परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीत पात्र ठरल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

संबंधित लेख

लोकप्रिय