Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरव्हिडिओ : जुन्नर तालुक्यातील संगणक परिचालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा !

व्हिडिओ : जुन्नर तालुक्यातील संगणक परिचालकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा !

Job Ad Banner
Advt.

नौकरी ढूंढ रहे हो।

यहां देखे

Visit our website mahajoblive.in

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींत काम करणारे ९२ संगणक परिचालक गेल्या तीन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. थकीत मानधन तातडीने न मिळाल्यास मंगळवार (दि. २२) पासून कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा संगणक परिचालक संघटनेने दिला असल्याची माहिती जुन्नर तालुका कार्याध्यक्ष पंढरीनाथ सरोदे यांनी दिली. 

यासंबंधीचे निवेदन गटविकास अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक  प्रविण जाधव यांना दिले, असल्याचेही ते म्हणाले.

गेली तीन चार महिने संगणक केंद्रचालक विना मानधन काम करत आहेत. अनेक वेळा शासन आणि कंपनी लेखी तसेच तोंडी तक्रार करूनही तुटपुंजे मानधन, थकीत मानधन तसेच अतिरिक्त मोबदला मिळालेला नाही. 

जुन्नर : पेसा क्षेत्रातील अवैध माती उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी

संगणक परिचालक ऑनलाईन डाटा एन्ट्रीचे काम करत असून, त्यांची नियुक्ती सीएससीमार्फत केली जाते. ग्रामपंचायत दप्तर संगणकीकरण ग्रामस्थांना विविध दाखले, केंद्र शासनाच्या ११ अद्यावलीत माहिती भरणे आदी कामे करतात. 

तालुक्यातील ९२ केंद्रे सीएसटी कंपनीला प्रत्येकी १२, ५०० रुपये दरमहा अदा करतत . याप्रमाणे तालुक्यातून दरमहा सुमारे ११.५० लाख रूपये कंपनीला मिळत असूनही कर्मचाऱ्यांना मानधन वेळेवर मिळत नसल्याची व्यथा आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

निवेदन देतेवेळी कार्याध्यक्ष पंढरीनाथ सरोगदे, अध्यक्ष जयसिंग भोजने, सचिव संदीप उघडे, संतोष कांबळे, मनोहर नांगरे, नितीन शिंदे, सचिन कुमकर, अल्पना पानसरे, गौरी सरजीने, संगीता सोनावणे, सुजाता गुजर आदी तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

वृद्ध महिलेच्या १ लाख ४० हजार किमतीच्या शेळ्या चोरणारा भामटा अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने द्राक्ष किंग 2022 चे परीक्षण सुरू


संबंधित लेख

लोकप्रिय