Sunday, December 22, 2024
Homeजिल्हा'पुणे तेथे काय उणे !' वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा

‘पुणे तेथे काय उणे !’ वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा

स्त्री शक्तीला पाठिंबा आणि पर्यावरण जागृतीसाठी पूरूषांनी केली वटपौर्णिमा साजरी         

                          

पिंपरी चिंचवड : पिंगळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि  जागृती समिती च्या वतीने पुरुष  वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात पूरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. यावेळी पुरुषांनी सात प्रदक्षिणा घालून दीर्घ आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाला सूत गूंडाळूण मनोभावे पूजा केली.

विकास कुचेकर म्हणाले की, महिलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन पुजा करावी. ऑक्सिजन देणाऱ्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या वृक्षाचे जतन करावे. वटवृक्षाची लागवड वसुंधरा संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

10 वी / 12 वी / ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे 338 पदांसाठी भरती

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महिला अध्यक्षा संजना करंजावणे म्हणाल्या, कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजन आभावी आपले प्राण गमवावे लागले, याचे गांभीर्य ओळखुन वृक्ष लागवड केली पाहिजे.

आण्णा जोगदंड म्हणाले की पत्नी व पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत. पुरूषप्रधान देशात महिला शेती, उद्योग इ सर्व क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा देऊन कर्तव्य पार पाडत आहेत. पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोचल्या आहेत. पत्नी हा संसाराचा प्राणवायू आहे. तिला आणि संपूर्ण स्त्री शक्तीला पाठिंबा देण्यासाठी पुरुष वटपौर्णिमा साजरी केली जात आहे, आयोजक व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

वृक्ष मित्र अरूण पवार म्हणाले की, प्राचीन वृक्ष ही निसर्गदत्त देणगी आहे. आम्ही सर्वाना पर्यावरण संरक्षण आणि संर्वधनाची व प्लास्टिक न  वापण्याची शपथ नागरिकांना देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड म्हणाल्या की, झाडांना मुलासारखे प्रेमाने जपले पाहिजे, प्लास्टिक मुक्त परिसर आणि परिसर स्वछता हा मूळ उद्देश आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, पिंपरी चिंचवड महीला अध्यक्षा मिना करंजावणे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गुणवंत कामगार काळुराम लांडगे, कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, सुरेश कंक, प्रकाश बंडेवार, राजेंद्र गोराने, आरोग्य निरीक्षण उद्धव ढवरी, मुकादम विजय कांबळे, लक्ष्मन जोगदंड, भरत शिंदे, प्रदिप बोरसे, अरविंद मांगले, जालिंदर दाते, शंकर नानेकर, दत्तात्रय अवसरकर, वसंत चकटे, विकास कोरे, नितीन जोगदंड उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय