Thursday, September 19, 2024
HomeNewsडॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे देशाला ‘एक भारत श्रेष्ठ भारत ’विचार मिळाला : आमदार...

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे देशाला ‘एक भारत श्रेष्ठ भारत ’विचार मिळाला : आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन 

पिंपरी चिंचवड : जम्मू – काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केले. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा विचार भारतीयांच्या मनात रुजवण्याचे काम डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी केले, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रीय नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी मोरवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, माजी महापौर राहुल जाधव, नंदू कदम, वैशाली खाड्ये, राजश्री जायभाय, वीणा सोनवलकर, कैलास सानप, विजय शिनकर, हेमंत देवकुळे, संजय परळीकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, जम्मू काश्मीरला इतर राज्यांप्रमाणे समान दर्जा, समान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्यांचे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी समर्थन केले आहे. १९५१ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जम्मू- कश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभा केले. त्यामध्येच त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर ६६ वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम रद्द करुन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय