मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी २४ आणि २५ फेब्रुवारीला आझाद मैदानावर धरणे आंदोलनाची घोषणा केली होती, आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कृती समितीच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन यांच्याशी सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साखळी धरणे आंदोलना दरम्यान, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सुमारे एक तास चर्चा केली.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती
यामध्ये मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, अंगणवाड्यांचे भाडे वाढवणे, मदतनिसांच्या भरतीबाबत निकष बदलणे, सेविकांची सुपरवायझर पदी भरती, किरकोळ खर्चाची रक्कम वाढवून ५००० रुपये मंजूर करणे, अंगणवाडीचे नियमित कामकाज सुरू करणे आदी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.
२०२१ ची उन्हाळी सुट्टी लॅप्स न होता पुढील वर्षी घेता येईल असा आदेश काढण्याचे त्यांनी मान्य केले. सेवाज्येष्ठतेप्रमाणे मानधनात ३,४,५% वाढ, ३१, ३२ रुपये वाढ, दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करणे आदी मागण्या मान्य करण्यात आल्या. या शिष्टमंडळात शुभा शमीम, कमल परुळेकर, सूर्यमणी गायकवाड व दत्ता देशमुख यांचा समावेश होता.
मोठी बातमी : नवाब मलिक यांना न्यायालयाने दिली 8 दिवसांची कोठडी
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती
या सकारात्मक चर्चेनंतर कृती समितीने २४, २५ फेब्रुवारीचे धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु २८ फेब्रुवारीपासून प्रकल्प व जिल्हा पातळीवर होणारी आंदोलने मात्र करण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.
या आंदोलनात एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यासह सुमारे ५०० अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
‘सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी… म्हणून कमळाबाई ती लाविते काडी, खा.अमोल कोल्हे यांची खोचक कविता
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी
भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !