Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाआदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार !

आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार !

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचे किसान सभेला आश्वासन

अहमदनगर : आदिवासी समुदायातील विविध घटकांचे प्रश्न तीव्र झाले असून प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची भेट घेऊन केली आहे. 

किसान सभेने यावेळी उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालय स्तरावर किसान सभेसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन के. सी. पाडवी यांनी किसान सभेला दिले, अशी माहिती कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिली.

शोषण विरहीत समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा – नरसय्या आडम

वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आदिवासी व वननिवासींना न्याय द्यावा, अभयारण्यात तसेच इतरत्र भोगवटा नंबर 2 च्या जमिनी बाबतचे प्रश्न तातडीने सोडवा. देवस्थान, इनाम, बेनामी, आकारीपड, गायरान, वरकस जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा. आंबेगाव, जिल्हा पुणे येथील जून 2020 मधील वादळात झालेल्या हिरडा पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शिक्षक संवर्गातील आरक्षण ) अधिनियम, या अन्यायकारक कायद्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर होत असले ला अन्याय दूर करावा.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे पेसा व वन कायद्याची पायमल्ली करुन अवैध लोह खदान सुरू आहे यामध्ये आदिवासींचे अधिकार व वनांचे रक्षण व्हावे. आदिवासी भागात रोजगार हमी, शिक्षण, आरोग्य, रेशन, घरकुल, सिंचन, विस्थापन, पुनर्वसन व पिण्याच्या पाण्याबाबतचे प्रश्न मार्गी लावावेत. आंबेगाव तालुक्यातील कातकरी वस्तीचा समावेश जवळच्या ग्रामपंचायत मध्ये करावा.

तलासरीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय

राज्यातील कातकरी समुदायाला विविध दाखले व विकास योजना मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत व पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्यांकडे किसान सभेने या भेटीत लक्ष वेधले. 

किसान सभेने उपस्थित केलेल्या या मुद्यांबाबत मंत्रालयस्तरावर सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येतील, असे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले असल्याचे डॉ ‌‌. नवले म्हणाले.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

भारतीय विज्ञान संस्थेच्या विविध पदांच्या १०० जागांसाठी भरती!

संबंधित लेख

लोकप्रिय