पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण राजेशिवाजीनगर ( पेठ क्र.16) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल प्रदेश सहसचिव सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कोंडीबा जगताप यांनी त्यांचा वाढदिवस आरोग्य शिबीर आणि गरजू महिलांना किराणा किट वितरित करून साजरा केला.
दत्त मंदिर राजेशिवाजीनगर, चिखली प्राधिकरण येथील प्रांगणात आयोजित शिबिरात रक्तदाब, मधुमेह इ सह 110 नागरिकांची करण्यात तपासणी करण्यात आली.
प्रा.डॉ.मेघना भोसले यांना नॅशनल वूमेन्स एक्सलन्स अवॉर्ड
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आयसीआयसीआय बँक सोशल फाउंडेशन मार्फत शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रमुख विजय लोखंडे यांनी केले. शहरातील घरेलू कामगार, विधवा, परितकत्या, अपंग आशा 40 गरजु महिलांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,महिला आघाडी अध्यक्षा कविता आल्हाट सह प्रतिभा जगताप, काशिनाथ जगताप, नाना बालघरे, चांगदेव बालघरे, विनोद विधाते, गणेश आंबेकर, तुषार भागवत, विश्वनाथ पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
– क्रांतिकुमार कडुलकर
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व विठ्ठलराव तुपे जयंतीनिमित्त अभिवादन !