Wednesday, February 12, 2025

सोशल मीडियावर ओळख ; प्रियकराकडून ब्लॅकमेल करत मित्रासोबत तरूणीवर अत्याचार

Social Media Crime in Pune News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात होऊन, एका १८ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर प्रियकराने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून ब्लॅकमेल करत तिला त्याच्या मित्रासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी अवघ्या १७ वर्षे सहा महिन्यांची असताना तिची सोशल मीडियावर आरोपीशी ओळख झाली. काही महिन्यांत ही ओळख प्रेमात बदलली, आणि दोघेही भेटू लागले. या भेटींच्या दरम्यान, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

व्हिडिओ काढून तरूणीला केले ब्लॅकमेल (Pune News)

आरोपीने तरुणीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ आणि फोटो गुपचूपपणे काढले. त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. धमकीला घाबरून तरुणीने आरोपीच्या मित्रासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास होकार दिला, असा गंभीर आरोप आहे.

या सर्व प्रकाराने कंटाळून अखेर पीडित तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पर्वती पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे या प्रकरणाचा तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

या घटनेने सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करताना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या प्रकरणाने सोशल मीडियाच्या गैरवापराचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आणले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

महाराष्ट्रावर कर्जाच्या बोजा, सरकारच्या तिजोरीवर ₹ 96,000 कोटींचा भार

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

LIC कडे ₹880 कोटींची दावा न केलेली रक्कम; तुमची रक्कम असू शकते का?

पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शिरकाव, वाचा काय आहे नेमका आजार

जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार

धक्कादायक : ज्योतिबा डोंगरावर प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा, भाविकांच्या जीवाशी खेळ!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles