Wednesday, February 12, 2025

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

Chittorgarh viral Video : राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षकांच्या अश्लील वर्तनाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेच्या पवित्र परिसरातील स्टाफ रूममध्ये घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षकांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणातील व्हिडिओ शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून, त्यामध्ये सामाजिक शास्त्राचे शिक्षक अरविंदनाथ व्यास आणि एका महिला शिक्षिका एकमेकांना मिठी मारत आणि अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. व्हिडिओ डिसेंबर 2024 चा असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Chittorgarh viral Video

ग्रामस्थांनी या कृत्याचा निषेध करत शाळेच्या नैतिकतेला धक्का पोहोचवल्याचे म्हटले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत, संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने शाळेतील शिस्तीचा भंग झाल्याबद्दल कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ग्रामस्थांनी शाळा हे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि संस्काराचे ठिकाण असून, अशा प्रकारचे वर्तन पूर्णतः अयोग्य असल्याचे सांगत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर शाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग योग्य प्रकारे होतो आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles