Neeraj Chopra And Himani Marriage : भारताचा सुप्रसिद्ध भालाफेकपटू आणि टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकला आहे. नीरजने हिमानी मोरसोबत लग्न केले असून, या आनंदाची माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया एक्स खात्यावरून दिली आहे.
Neeraj Chopra ने केलेली सोशल मीडिया पोस्ट
नीरजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की। 🙏 Grateful for every blessing that brought us to this moment together. Bound by love, happily ever after. नीरज ♥️ हिमानी”
हिमानी मोर ही हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील लडसौली गावाची रहिवासी असून, सध्या अमेरिकेत टेनिस कोच म्हणून कार्यरत आहे. कुटुंबातील निवडक सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नीरज चोप्रा भारताचा अव्वल खेळाडू असून, 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. या यशानंतर त्याने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवत पुन्हा एकदा भारताचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या यशाने तो जागतिक स्तरावर प्रेरणादायी खेळाडू म्हणून ओळखला जातो.
खेळाच्या मैदानात आपल्या कर्तृत्वाने नावाजलेल्या नीरजने वैयक्तिक आयुष्यातही एक मोठा निर्णय घेतला आहे, नीरज चोप्रा आणि हिमानी मोर यांच्या या नव्या जीवनप्रवासाला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या या नव्या अध्यायासाठी खेळाडू, चाहते आणि कुटुंबीयांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


हे ही वाचा :
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक
इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा