Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

Akshay Shinde Encounter : बदलापुरातील शाळकरी मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील पाच पोलिसांना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

---Advertisement---

अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत झालेल्या एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे स्वसंरक्षणार्थ कारवाई करत त्याला ठार मारावे लागले. मात्र, या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Akshay Shinde चे बंदुकीवर फिंगरप्रिंट्स आढळले नाही

मॅजिस्ट्रेटच्या अहवालात असे नमूद करण्यात आले की, एन्काऊंटरमध्ये वापरलेल्या बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स आढळले नाहीत. यामुळे पोलिसांचा दावा सिध्द होऊ शकला नाही. न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पाच पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत, त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

---Advertisement---

अक्षय शिंदे बदलापुरातील एका शाळकरी मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याला कारागृहातून दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येत असताना एन्काऊंटर घडवून आणल्याचा आरोप होता.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांच्या कारवाईच्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !

मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles