एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार (Nashik)
नाशिक (क्रांतीकुमार कडुलकर) – महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. (Nashik)
सी.आय.टी.यु. संलग्न असलेल्या आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने दिनांक 18 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र प्रसारित केले. आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी किरण ढमढेरे यांनी एम. आर.टी.यू. आणि पी. यू. एल. पी. कायद्याचे कलम २४(१) मधील तरतुदीनुसार 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थांना कायदेशीर २१ दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत जर आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न केल्यास आरोग्य मित्र महाराष्ट्रभर बे मदत काम बंद आंदोलन करणार आहेत.
या अगोदर २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोग्यमित्र संघटनेने एक दिवसीय काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मुंबई एक दिवसीय आंदोलनासाठी गेले होते. त्यावेळी राज्य आरोग्य आम्ही सोसायटी आणि सहाय्य संस्था व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आरोग्य मित्राची पगार वाढ आणि इतर समस्यांची चर्चा झाली. सर्व चर्चा सकारात्मक झाली.
राज्य आरोग्य आम्ही सोसायटीने सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू. तसेच बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचे इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आले होते. आचारसंहिता संपून गेली नवीन सरकारचे देखील स्थापना झाली. तरी देखील राज्य आरोग्य हमी सोसायटीने आरोग्य मित्रांच्या मागण्याचा विचार केला नाही.
२२ डिसेंबर २०२४ रोजी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशिक येथील सिटी भावनात एक दिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीला पुन्हा पत्र व्यवहार करून आरोग्य मित्रांच्या मागण्यासाठी बैठकीची वेळेची मागणी केली.
परंतु बैठकीसाठी कोणताही निरोप न आल्यामुळे आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी एम. आर. टी. यू आणि पी. यू. एल. पी. कायद्याच्या कलम २४(१) मधील तरतूदीनुसार 12 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
Nashik
आरोग्य मित्राच्या मागण्या खालील प्रमाणे
१) आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार २६०००/- स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा.
२) दरवर्षी वेतन दहा टक्के पगार वाढ व्हावी
३) आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा.
४) आरोग्यमित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावे.
५) आरोग्यमित्राचे बदलीचे धोरण रद्द करावे.
६) आरोग्य मित्र रमेश पंडित बसणे आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे.
७) आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेने पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी होऊ नये उपदान दिले नाही ते देण्यात यावे.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित
दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी
राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले