Thursday, March 13, 2025

मोठी बातमी : सैफ अली खानवर चाकू हल्ल्या, 6 मोठ्या गंभीर जखमी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या वांद्रे पश्चिम येथील घरात गुरुवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. या चोरीदरम्यान सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. यावेळी सैफने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, घुसखोर आणि सैफ यांच्यात झटापट झाली. या दरम्यान हल्लेखोराने चाकूने हल्ला करून सैफला गंभीर जखमी केले.

Saif Ali Khan रुग्णालयात दाखल

सैफ अली खानला (Saif Ali Khan) तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे आणि हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

या घटनेदरम्यान घरातील इतर सदस्य कुठे होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, करिश्मा कपूरने हल्ल्याच्या नऊ तासांपूर्वी तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये करीना कपूर, रिया कपूर आणि सोनम कपूरसोबत ती पार्टी करताना दिसत होती. करीनानेही हा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केला होता.

सध्या या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असून, पोलिसांनी घरातील 3 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

नायलॉन मांज्यामुळे नाशिक आणि अकोला मध्ये गळा चिरून दोन जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, महायुतीच्या आमदारांना करणार मार्गदर्शन

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

Related Articles

- Advertisement -

Latest Articles