पालघर : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ठाणे-पालघर जिल्हा कमिटीचे १२ वे जिल्हा अधिवेशन रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी तलासरी येथील कॉ.गोदावरी परुळेकर भवन येथे DYFI चे राज्य अध्यक्ष साथी सुनील धानवा व संघटनेच्या राज्य सचिवा डॉ.प्रीती शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या अधिवेशनाची सुरुवात जिल्हा अध्यक्ष साथी नंदकुमार हाडळ यांच्या हस्ते झेंडावंदन व शहिदांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे राज्य अध्यक्ष साथी सुनील धानवा यांनी केले. यावेळी अ.भा.किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ.किरण गहला यांनी अधिवेशनाच्या खुल्या सत्रात शुभेच्छा संदेश दिले.
“समाजात तेढ निर्माण करणे चुकीचे” नाना पाटेकर यांनी मांडले परखड मत
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नागपुरात होणार !
त्यानंतर सुरेश भोये, नंदिनी म्हसकर,व टोलूराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधी सत्र चालले. यावेळी श्रद्धांजली ठराव मांडण्यात आला. नंदकुमार हाडळ यांनी अहवाल सादर केला. या अहवालावर चर्चा करण्यात आली असून प्रतिनिधी आपले मत व्यक्त केले व एकमताने अहवाल मंजूर केले.
सिटू चे राज्य सहसचिव व डहाणू मतदारसंघाचे आमदार कॉ.विनोद निकोले यांनी ही शुभेच्छा दिल्या. यानंतर पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवनिर्वाचित समिती गठीत करण्यात आली. यामध्ये नंदकुमार हाडळ यांची जिल्हा अध्यक्षपदी तर राजेश दळवी यांची जिल्हा सचिव नव्याने निवड करण्यात आली. ११ सदस्यांचे सचिवमंडळ करण्यात आले. २४ सदस्यांची जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली. यावेळी डॉ.प्रीती शेखर यांनी अधिवेशनाचे समारोप केले. संघटनेच्या घोषणा देऊन अधिवेशनाची सांगता करण्यात आली.
शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा