Monday, December 23, 2024
Homeजिल्हाPune : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना...

Pune : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले

पुणे : वाघोली परिसरात रविवारी रात्री एक भीषण हिट अँड रन अपघात घडला आहे. डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांचा काका असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune)

वाघोली येथील केसनंद फाट्यावर रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली पोलीस ठाण्याजवळ डंपरने फुटपाथवर झोपलेल्या कामगारांना चिरडले. मृत आणि जखमी कामगार हे अमरावतीहून पुण्यात (Pune) कामासाठी आले होते. अपघाताच्या वेळी ते फुटपाथवर गाढ झोपेत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त डंपर बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा असून चालक मद्यधुंद अवस्थेत होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर फुटपाथवर चढला आणि ही दुर्दैवी घटना घडली.

जखमींमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री अमरावतीहून आलेले हे कामगार पुण्यात कामासाठी आले होते. मात्र त्यांच्या आयुष्यावर काळाने घाला घातला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अशीच भीषण घटना वाघोली येथे घडल्याने शहरात चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे. मद्यधुंद डंपर चालकाविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Pune

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

BMC : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

ब्रेकिंग : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेणार

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती

खूशखबर : बँकेत तब्बल 13 हजार पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय