जुन्नर /आनंद कांबळे : परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा माकप आंबेगाव तालूका समितीने निषेध व्यक्त करून संबंधित घटनेला दोषी असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. (Ambegaon)
आपला देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाच्या परभणी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील प्रतिकृतीची दि. १०/१२/२०२४ रोजी एका माथेफिरूने विटंबना केली. हि बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंबेगाव तालुका समितीतर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच या घटनेनंतर उसळलेली दंगल व त्यात पोलिसांची भूमिका याविषयी काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतून बळी गेलेल्या युवकांला न्याय मिळून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ही माकपचे आंबेगाव तालुका समिती यांनी तहसीलदार यांच्या मार्फत राज्यशासनाकडे केली आहे. (Ambegaon)
यापुढे अशा प्रकारे भारतीय संविधान किंबहुना देशासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिलेल्या कोणत्याही क्रांतिकारी, समाजसुधारक वा स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रतिकृतींची विटंबना होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशीही मागणी ही या निवेदना मार्फत मागणी करण्यात अली आहे. सदरील निवेदन हे तहसील कार्यालयात देण्यात आले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव अशोक पेकारी व तालुका समिती सदस्य डॉ. अमोल वाघमारे, बाळू वायाळ, राजू घोडे, अविनाश गवारी, दत्ता गिरंगे, कमल बांबळे, रामदास लोहकरे, देविका भोकटे यांनी हे निवेदन सादर केले आहे.
(Ambegaon)
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी