Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना नोव्हेंबर 2024 पर्यंतचे हप्ते मिळाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी असा सवाल सातत्याने विचारला जात असताना आता महत्वाची माहिती समोर येत आहे.

---Advertisement---

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी फायदेशीर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. अशात डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याची माध्यमांना सांगितले.

---Advertisement---

सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींना हा महत्त्वाचा दिलासा दिला. “डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही तांत्रिक कामे सुरू असून ती लवकर पूर्ण होणार आहेत,” असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले जातील, काही महिला अपात्र ठरतील, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, मुनगंटीवार यांनी यास पूर्णतः खोटे ठरवत, “निकष बदलले जाणार नाहीत. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करा. ही योजना कुठेही बंद पडणार नाही,” असे ठामपणे सांगितले.

Ladki Bahin Yojana

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles