पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – “अभिराज फाउंडेशन” वाकड पुणे ही संस्था ऑटिझम व बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी शाळा व कार्यशाळा चालवीत असून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. (PCMC)
6 डिसेंबर 2024 रोजी “पुणे सेवासदन दिलासा “कार्यशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या दिव्यांगांच्या योगासन स्पर्धेमध्ये कु. संतोष कोळी यांनी सिल्वर पदक मिळवले. विजेत्यांना जिल्हा परिषद पुणे दिव्यांग शाखा येथील अधिकारी श्रीमती देशपांडे मॅडम यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते श्रीमती विद्या रुपनाळकर यांनी तसेच जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने दिव्यांग मुलांसाठी शिक्षण, कला, क्रीडा आणि संगीत या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या विशेष शिक्षकांचा गौरव 9 डिसेंबर 2024 रोजी “नवक्षितिज ” या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. (PCMC)
यावेळी “अभिराज फाउंडेशनच्या भाग्यश्री दत्तात्रय कापसे व स्मिता दशरथ हांडे यांचा सत्कार श्री. प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या गौरवाबद्दल अभिराज फौंडेशनचे ट्रस्टी स्वाती तांबे व रमेश मुसूडगे व सल्लागार अभिजीत तांबे, संस्थेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर
वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !
पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती