पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – दत्त जयंतीच्या निमित्ताने शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये शुक्रवार दि. ६तारखेपासून गुरुचरित्र पारायणला सुरुवात झाली आहे. (PCMC)
दोनशेपेक्षा अधिक महिला व पुरुष पारायणासाठी बसलेले आहेत. १२ तारखेपर्यंत हे पारायण चालणार आहे. तसेच १४ तारखेला दत्त जयंती असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
सकाळी सात वाजता श्री चा अभिषेक व होम हवन सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. साडेपाच वाजल्यापासून दत्त जन्माचे कीर्तन होणार आहे. कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज तांबे (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. सात वाजता दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
सव्वा सात वाजता महाआरती होणार असून त्यानंतर स्वर सागर हा भक्ती संगीताचा कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहे. तसेच आरती झाल्यानंतर महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. (PCMC)
वरील सर्व कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठानचे सर्व सहकारी प्रा. हरि नारायण शेळके, दीपक पाटील, राजू गुणवंत, सारिका रिकामे, क्षमा काळे, अंजली देव, नीलिमा भंगाळे, चैतन्य बनकर, इत्यादींचा नियोजनामध्ये सहभाग आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर
वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !
पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती