पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आपल्याकडे अपघाताने लीडर घडले जातात.विद्यार्थ्यांना लीडरशिपचे प्रशिक्षण किंवा अनुभव शालेय जीवनात मिळाल्यास याचा समाजाला फायदा तर होणारच आहे, या उपक्रमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित मिळेल आणि यातून लीडर्स तयार होतील, यामुळे देशाला फायदा होईल . असा विश्वास आयआयटी बॉम्बे _ मोनॅश रिसर्च अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम एस उन्नीकृष्णन यांनी व्यक्त केला. (PCMC)
निगडी येथील सीएमएस इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने आयोजित कऱण्यात आलेल्या स्टुडन्ट मेंटॉरशिप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टीपी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर, उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, खजिनदार पी अजयकुमार, कलावेधी विभागप्रमुख पी.व्ही भास्करन,पी.सी विजयकुमार, जॉय जोसेफ,एम.के मोहनदास, टीव्ही ओम्मान,जी रवींद्रन, मुख्याध्यापिका बिजी गोपकुमार, चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)
यावेळी अध्यक्ष विजयन म्हणाले की एका वर्गातून दहा सदिच्छादूत नेमलेले आहे.त्यांच्यावर बाकीच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी मदत करणे ही जबाबदारी असेल प्रत्येक विद्यार्थ्याला पाच -पाच विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली जाईल.
ज्या विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहेत, त्या गुणांचा विकास करणे, आणि त्या विद्यार्थ्याला सर्वतोपरी मदत करणे हा मुख्य हेतू या कार्यक्रमाचा आहे.संपूर्ण शाळेतून पहिली ते दहावीपर्यंतचे 352 विद्यार्थ्यांची मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण भारतातून प्रथमच आपल्या सीएमएस स्कूलमध्ये होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीजी पिल्ले यांनी केले. सूत्रसंचालन सजिता पिल्ले यांनी तर आभार सोफिया मार्गारेट यांनी मानले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर
वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !
पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती