पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने फेरीवाला संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष व कामगार नेते काशिनाथ नखाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. (PCMC)
हा विशेष मेळावा खंडोबा मंदिर सभागृह, खंडोबा माळ, आकुर्डी चौक, पुणे 35 येथे मंगळवारी, 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
कार्यक्रमातील मुख्य मुद्दे:
पीएम स्वनिधी योजना अंतर्गत ₹10,000, ₹20,000 आणि ₹50,000 पर्यंत कर्जाची माहिती.
फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटप.
हॉकर झोन प्रक्रियेचा आढावा.
स्वच्छ व सुंदर अन्नप्रक्रिया योजनेसाठी मार्गदर्शन.
स्मार्ट सिटी – स्मार्ट हॉकर्स उपक्रमाची माहिती.
गुणवंत पालक व पाल्यांचा विशेष सन्मान.
संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान.
या कार्यक्रमातून फेरीवाल्यांच्या हक्कांची जपणूक, त्यांचे सक्षमीकरण आणि नागरी सुविधांची प्रभावी अंमलबजावणी साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. फेरीवाल्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरेल. (PCMC)
सर्व फेरीवाल्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर
वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !
पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती