Thursday, December 12, 2024
HomeबॉलिवूडMumbai : 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

Mumbai : 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

Mumbai : मुंबईच्या वांद्रे परिसरात एका दुर्दैवी घटनेत 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला आहे. शिवानी सिंह असे या अभिनेत्रीचे नाव असून ती मालाडमध्ये राहत होती आणि फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत होती.

शिवानी सिंह तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून वांद्रे येथील आंबेडकर रोडवर प्रवास करत होती. यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत शिवानी थेट डंपरच्या चाकाखाली आली, तर तिचा मित्र काही अंतरावर पडला. घटनेनंतर दोघांनाही गंभीर अवस्थेत भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले.

या घटनेनंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी डंपर जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवानीच्या मित्राने हेल्मेट घातलं होते, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत टळली. मात्र, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून तो सध्या उपचार घेत आहे.

या अपघातात कोणतीही नशेची लक्षणे दिसून आली नाहीत. शिवानीचा मित्र, दारुच्या नशेत नव्हता.तो पूर्णतः शुद्धीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवानीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे राज्यात वाढत्या हिट अँड रन घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि अशा प्रकारच्या घटनांवर त्वरित कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. शिवानीच्या अकाली निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Mumbai

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

संबंधित लेख

लोकप्रिय