Thursday, December 12, 2024
Homeताज्या बातम्याDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय (Devendra Fadnavis)

जन्म : २२ जुलै, १९७०

जन्म ठिकाण : नागपूर

शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता.

अपत्ये : एकूण १ (एक मुलगी).

व्यवसाय : सामाजिक कार्य.

पक्ष : भारतीय जनता पक्ष.

मतदार संघ : ५२ – नागपूर (दक्षिण-पश्चिम), जिल्हा – नागपूर.

इतर माहिती :

कार्यकारी सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (युनायटेड नेशन्सद्वारा मान्यता प्राप्त संस्था): उपाध्यक्ष, दि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक (भोसला मिलिटरी स्कूल), उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, अध्यक्ष, स्व. आबाजी थत्ते अनुसंधान संस्थानचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर; अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केट बॉल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विविध उपक्रमात सहभाग.

१९८९ वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, धरमपेठ वॉर्ड, नागपूर; १९९० प्रसिद्धी प्रमुख, भाजप, नागपूर (पश्चिम); १९९२-९५ अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, नागपूर शहर; १९९५-२००४ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, भारतीय जनता युवा मार्चा; २००४ – २००९, २००९ –२०१४ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; २००९ भाजप विदर्भ निवडणूक प्रमुख, २०१० महामंत्री, २०१२-२०१४ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; ग्लोबल पार्लमेंट या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे प्रथम भारतीय लोकप्रतिनिधी;

उपाध्यक्ष, ग्लोबल पार्लमेंट फोरम, हाबीतात; १९९२ व १९९७ नागपूर महानगर पालिका सदस्य व १९९७ मध्ये महापौर, महानगरपालिका, नागपूर; १९९८ मे अरइन कौन्सिल पद्धती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड;

१९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, सदस्य, विधानमंडळ नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, विनंती अर्ज समिती, गृहनिर्माण व नगरविकास स्थायी समिती सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समिती; सदस्य, कार्यकारी परिषद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ; ओ.बी. सी, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न; अध्यक्ष, निती आयोग शेती विषयक उच्चाधिकार समिती, भारत सरकार, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने सन २००३ या वर्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार प्राप्तः ‘उत्कृष्ट वक्ता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त; रोटरी क्लबचा “मोस्ट चॅलेंजिंग युथ अॅवार्ड” प्राप्त, हिंदू लॉ विषयात नागपूर विद्यापीठाचा “बी. के. बोस अॅवॉर्ड” प्राप्त; प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मुक्तचंद पुणे या संस्थे तर्फे “उत्कृष्ट संसदपटु” पुरस्कार, प्रकाश जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राजयोगी नेता पुरस्काराने सन्मानीत; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानीत.

यशदा, पुणे येथे अर्बन फायनान्सिंग विषयावर व्याख्याने दिली. ३१ ऑक्टोबर २०१४ ते २१ नोव्हेंबर, २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर, २०१९ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, डिसेंबर २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

३० जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, खाती -गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार. नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

(Devendra Fadnavis)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय