Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ई-सेमिनार संपन्न

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ई-सेमिनार संपन्न

हडपसर : एस.एम.जोशी कॉलेजमधील प्राणीशास्त्र विभाग, भूगोल विभाग आणि आय. क्यू. ए. सी.  विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ई-सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आंतरराष्ट्रीय ई-सेमिनारचा उद्देश सांगून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व ओळख करून दिली.

आंतरराष्ट्रीय ई-सेमिनारचे उद्घाटन जम्मू आणि काश्मीर युनिव्हर्सिटीतील डॉ.कुलदीप शर्मा यांनी केले. त्यांनी “जैवविविधतेवर मानवी हस्तक्षेपाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव” याविषयी माहिती दिली. सत्राचे अध्यक्ष एस. आर. टी. एम. युनिव्हर्सिटी नांदेड यथील प्रा.डॉ. आर. एम. मुलानी होते.

मोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्या!

आंतरराष्ट्रीय ई-सेमिनारच्या सकाळ सत्राचे वक्ते डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई यांनी मानववंशीय आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींशी जैवविविधतेचा ऱ्हास व त्याचा संबंध यावर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी विभागप्रमुख प्रा. एस. डी. शिंदे होते. तर दुपार सत्राचे वक्ते पोलंड येथील वॉर्सव्हा युनिव्हर्सिटीतील डॉ. रॉबर्ट कॅस्परझाक होते. जलचर वन्यजीवांमध्ये मानवी हस्तक्षेपाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा होणार परिणाम यावर मार्गदर्शन केले. 

या सत्राचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध, संचालक प्रा. विजय खरे होते. सायंकाळच्या सत्राचे वक्ते फ्लोरिडा युनिव्हर्सिटी अमेरिकाचे डॉ. रॉबर्ट परेरा हे होते. विविध प्रकारच्या कीटकांच्या संदर्भात निसर्गातील विविध प्रकारच्या परस्परसंवादावर आणि त्यांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो. यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष म्हणून  शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे  डॉ.माधव भिलावे यांनी मार्गदर्शन केले.

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !

समारोपाचे समारंभासाठी डायरेक्टर नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओसिनोग्राफी गोवा येथील  डॉ. बबन इंगोले यांनी मानववंशीय हस्थक्षप, पर्यावरण आणि पर्यावरणावर होणारा परिणाम यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी पर्यावरणावरील विविध प्रकारच्या मानववंशीय कृतींबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा शितोळे व प्रा. अमोल पवार यांनी केले.


संबंधित लेख

लोकप्रिय