पिंपरी चिंचवड : २३ मार्च शहीद दिवस निमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पिंपरी (DYFI) चिंचवड शहर समिती यांच्या वतीने १० ते १८ वयोगटातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने बालकानी सहभाग नोंदवला.
निसर्गचित्र, वर्तुळातील नक्शी, पर्यावरणा विषयी चित्र, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे व्यक्तिचित्र हे चित्रकलेचे विषय होते.
सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शहीदांना अभिवादन !
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांचा 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप !
१० ते १४ वयोगटामध्ये मिसबा नसिर शेख तर १४ ते १८ या वयोगटात श्रद्धा मनोज शिंदे हिने पहिला नंबर पटकावत बाजी मारली. १० ते १४ गटात दुसऱ्या स्थानावर आदिती शिंदे तर तिसऱ्या स्थानावर शार्दूल परदेशी यांनी बाजी मारली १४ ते १८ गटात दुसऱ्या स्थानावर आदर्श पांडे तर तिसऱ्या स्थानावर सौरभ चव्हाण हा जिंकला.
बक्षीस संभारंभाच्या कार्यक्रमाचे सुरवात ज्येष्ठ नागरिक नारायण कातळकर यांनी शहीद भगतसिंग याना पुष्पअर्पण करून केली, त्यानंतर कॉ.प्रफ्फुल कऊडकर यांनी “ए भगतसिंग तू जिंदा हे !” या गाणे गाऊन सुरवात केली. अध्यक्षस्थानी शिक्षिका पाचभाई मॅडम होत्या तर डी. वाय. एफ. आय. पुणे जिल्हा सचिव कॉ. सचिन देसाई यांची डी. वाय. एफ. आय. पिंपरी चिंचवड शहर सचिव कॉ. अमिन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी भरती
शहिद भगतसिंग यांचा २३ वर्ष ६ महिने २६ दिवसांचा क्रांतिकारी प्रवास थोडक्यात सांगितला व नवीन पिढीला शहिद भगतसिंग यांच्या बद्दल वाचन करा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी डी. वाय. एफ. आय. पिंपरी चिंचवड शहर समितीचे उपाध्यक्ष शिवराज अवलोल, सहसचिव भार्गवी लाटकर, गौरव पानवलकर, इम्रान मुलांनी, आकाश तावरे यांची उपस्थिती होती.
– क्रांतिकुमार कडुलकर