Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिघी बायपास रस्त्याच्या कामाला ‘‘गती’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा...

PCMC : दिघी बायपास रस्त्याच्या कामाला ‘‘गती’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

दिघीतील वाहतूक कोंडी कमी करण्यास होणार मदत (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दिघी- भोसरीला जोडणारा सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) च्या भिंतीलगत असलेल्या दिघी बायपास रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले असून, लवकरच रहदारीसाठी खुला करण्यात येणार आहे. (PCMC)

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण पुढाकार घेतला आहे. दिघी-भोसरी सीएमई सीमा भिंतीलगतच्या रस्त्याचे काम करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार कामाला सुरूवात करण्यात आली.

माजी नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, दिघी-भोसरी सीएमई भिंतीलगतचा रस्त्यामुळे भोसरीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता (बायपास) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांचा वेळ व किमान १ किमीचे अंतर वाचणार आहे.

धर्मवीर संभाजी महाराज चौकातील (ममता स्वीट जवळील) ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज संध्याकाळ च्या वेळेस धर्मवीर संभाजी महाराज चौकात ट्रॅफिक जाम होते. अनेक नागरिक त्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकतात. आता रस्त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. (PCMC)

प्रतिक्रिया

समाविष्ट गावांतील महानगरपालिका मंजूर विकास आराखडाप्रमाणे (डीपी) रस्ते विकसित करण्यावर आम्ही प्राधान्याने भर दिला आहेत. रस्ते आणि पायाभूत सोयी-सुविधा विकसित केल्यामुळे ‘‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला.

दिघीची कनेक्टिव्हीटी वाढवणे आणि धर्मवीर संभाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडण्यासाठी सीएमई भिंतीलगतचा रस्ता मदतशील ठरेल. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय