आळंदीत सामाजिक बांधिलकीतील उपक्रम (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील शंभुराजे सेवाभावी संस्था संचलित राजे ग्रुप, सनराईज आळंदी यांचे वतीने गणेशोत्सव निम्मित सामाजिक बांधिलकीतून आयोजित रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे नगरसेवक रविभाऊ लांडगे यांच्या हस्ते झाले. (PCMC)
रक्तदान शिबिरास मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधिर मुंगसे, राजाभाऊ चोपदार, रामशेठ गावडे, माऊली कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, राहुल चव्हाण, सचिन घोलप, महेश पगडे, बाप्पु सस्ते, गणेश भोसले, गणेश गवळी, चेतन टिमगिरे, नवनाथ लांडगे, अमित लांडगे, रोहन कुऱ्हाडे, सतिष कुऱ्हाडे, रवींद्र थोरवे, शिवाजी पगडे, गोविंद कुऱ्हाडे,आशिष गोगावले, अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर तौर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळास विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन देऊन सन्मानित करण्यात आले. गुरु शिष्य परंपरा जोपासत मंडळाचे वतीने गुरुवर्य शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी एकमेव युवती राजास रंधवे यांनी रक्तदान करीत महिला युवतींनी देखील रक्तदान करण्यास पुढे येण्यासाठी स्वतः रक्तदान करीत संदेश दिला. (PCMC)
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पगडे, अध्यक्ष दयानंद मंजुळे, विठ्ठल गोडसे, बाळा मुलगिर, माऊली काळकर, नारायण घोलप, खुशाल चौधरी, माऊली महाराज सुतार, संतोष कानडे, पोपट म्हेत्रे, पिंपरी चिंचवड ब्लड बॅंक डॅा.गोरख ननवरे, डॉ धर्मराज निळे, डॅा.सिमिर जमादार यांनी रक्त संकलन केले. मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद यांनी शिबिर यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती