कोपरे : जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोपरे , मांडवे, जांभुळशी, मुथाळणे, चार गावाच्या बारा – वस्त्या मधील 35 महिला बचत गटाच्या प्रत्येकी महिलेला 12 हजार रूपये अर्थसहाय्य चाईल्ड फंड इंडिया संस्था पुणे शाखेने दिले आहे. हि संस्था जागतिक स्तरावर काम करत असून संस्थेच्या माध्यमातून आदिवासी गावानं मध्ये आरोग्य ,शिक्षण, स्वच्छता अभियान, उपजीविका आधारित उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येतात.
जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील हि चार गावे अविकसित आहेत. 90 टक्के लोकांची उपजीविका हि आजही कोरडवाहू शेतीवरच अवलंबुन आहे. पर्यायाने ग्रामीण भागातील कुटूंब पिढीजात शेती व्यवसाय व बिगर शेती व्यवसाय शेती क्षेत्राशी निगडित मोल मजुरीसाठी 30 किमी अंतरावर बनकरफाटा देसात जात असतात. आदिवासी महिलांना कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अवजड श्रमाची कामे करावी लागतात, मात्र तिच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळत नाही.
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
उद्योजकता प्रशिक्षणामुळे ज्ञान व कौशल्य आत्मसात करता येईल आत्मसन्मान व आत्मनिर्भरता येऊन ग्रामीण भागात विकासाला चालना मिळेल असा विश्वास आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यकर्ते रामदास दाभाडे व सुनील माळी यांनी व्यक्त केला आहे.
चाईल्ड फंड संस्थेच्या वतीने सिटी प्रॉजेकट अंतर्गत आदिवासी भागातील बचत गटाच्या गरजू महिलांना उद्योजकता कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रम अंतर्गत महिलांना 7 दिवसीय उदोजकता विकास प्रशिक्षण व उदयोग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी रुपये 12 हजार अर्थसाहाय्य केले जात आहे. उदयोग उभारणीसाठी शासकीय अर्थ सहाय्य योजना माहिती महिलांना प्रशिक्षण माध्यामातून दिली जात आहे.
व्हिडिओ : तब्बल 600 जवान हवेत झेपावले, भारतीय जवानांचा हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
आता पर्यंत 35 महिला बचत गटाच्या महिला निधी प्राप्त झाला असून बाकीच्या उर्वरित गरजू महिलांना लवकरच निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी चाईल्ड फंड इंडिया संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी प्रोग्राम आणि पार्टनरशीप राजीव रमण, महाराष्ट्र राज्य प्रोग्राम स्पेशालिस्ट श्रीमती शाईनी मॅडम, पुणे शाखेचे वरिष्ठ अधिकारी अभिजित मदने हे मार्गदर्शन करत आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व स्टाफ पंचायत समिती जुन्नर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
या भागातील चार गावामधील महिलांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांचे फ्रॉम भरणे बँक खाते ओपन करणे, प्रशिक्षण केंद्र माहिती देणे, महिलांना एकत्रित करून माहिती देणे अशी छोटी मोठी कामे आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते रामदास दाभाडे, गणपत मुठे अंकुश माळी ,राहुल कवटे, संजय कुडळ,पारुबाई ठोगिरे, किसन माळी, सत्या मुठे, उमेश माळी असे अनेक कार्यकर्ते करत असून त्याचे मोलाचे सहकार्य संस्थेला मिळत आहे. गरजू महिलांनी आदिवासी युवक परिवर्तन प्रतिष्ठान संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मुठे यांनी केले आहे.
ब्रेकिंग : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल डिझेल दरात आज पुन्हा वाढ
सावधान ! राज्यातील “या” जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा