पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई) मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (PCMC)
यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते समाजसेवक व प्रमुख पाहुणे डॉ. शाळीग्राम भंडारी यांचा स्मृतिचिन्ह देऊन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, सीबीएसईच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, बीएडच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम समवेत 20 हून अधिक विभाग प्रमुखाकांचा व विशेष नैपुण्य प्राप्त प्राध्यापक, शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. (PCMC)
शिक्षक व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डॉ. शाळीग्राम भंडारी पुढे म्हणाले, शिक्षकांनी आपली देहबोली सकारात्मक ठेवली पाहिजे. परिवर्तनाची कास दैनंदिन आचरणात आणली तरच विद्यार्थी व समाजात परिवर्तन घडू शकेल. त्यासाठी अहंकार बाजूला ठेवा, संवाद संवेदनशील ठेवा. छोट्या-छोट्या गोष्टीतूनच विद्यार्थी घडत असतो. (PCMC)
विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त करण्याची नाडी तुमच्या हातात आहे. विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हेरून त्यांना त्या त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षक व संस्थाचालकांनी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी केले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम तुम्ही शिक्षक लोक करता. तुम्हाला त्याचे समाधानही मिळते. बुद्धिमत्ता, अनुभव, संस्कार, प्रेमानेच भारताचे उज्वल भविष्य निर्माण करणारे तुम्ही सर्वजण आहात. शिक्षण हे समाज व राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांच्या प्रति असलेले प्रेमच त्यासाठी प्रेरक असते त्यांना घडविण्यासाठी क्षणाक्षणाला जो शिक्षक सतत झिजत असतो त्याच्यासाठी आजही समाज मनात आदर कायम आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रा.गीता कांबळे, प्रा.पल्लवी चव्हाण यांनी केले.
***
***
***