पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : एस.पी.स्कुल वाकडच्या प्रांगणात गुणवंत कामगार कल्याण मंडळ शाखा, पिंपरी चिंचवड च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. (PCMC)
या निमित्ताने शिक्षिका व शिक्षक ह्यांचा सन्मान करण्यात आला. स्मृती चिन्ह, शाल, तुळशीचे रोप हे सन्मानाचे स्वरूप होते. दरवर्षी भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करीत असतो.
सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक होते.स्वातंत्र्यापुर्वी पासुन ४०वर्ष आदर्श शिक्षक म्हणून सेवा दिली. समाजामध्ये शिक्षक समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील असतात. येणारी नविन पिढी सुदृढ, सुसंस्कृत व्हावी हा उद्देश मनात ठेवून, शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी, शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून गुणवंत कामगार कल्याण मंडळाने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. (PCMC)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण, प्रा. शिवाजी बुचडे संस्थापक, सनफ्लोअर पब्लिक स्कुल हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. पी. स्कुलचे संस्थापक प्रा.श्री.अंकुश बोडके होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिलिंद बेंबळकर ह्यांनी विद्यार्थ्यासाठी मोबाईल फोनचे दुष्परिणाम ह्या विषयावर व्याख्यान दिले. त्यामध्ये मोबाईल मुळे आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे मोबाईलचा कामापुरता वापर करा. असे सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.भारती चव्हाण ह्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहाण्याचे आव्हान शिक्षकांना केले. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असणार आहे.
त्यामुळे संस्कारक्षम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून समाजहित जोपासता येईल त्यामुळे समाजा बरोबर देशाची विकास होईल. त्यासाठी शिक्षकांचे मनोबल वाढवने महत्वाचे आहे. म्हणुन आज आदर्श शिक्षण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक शहराध्यक्ष महमंदशरीफ मुलाणी यांनी केले.सुत्रसंचालन बाळासाहेब साळुंके यांनी केले. आभार महे़ंद्र गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब साळुंके मोहम्मदशरीफ मुलानी, नंदकुमार धुमाळ, महेंद्र गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी एकोंडे, भरत शिंदे, गुणवंत कामगार कल्याण मंडळ पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या सर्व सभासदांनी विशेष प्रयत्न केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार्थी मुख्याध्यापक दिलीप सातपुते (निलंगा),चंद्रकांत सोनवणे (वाकड), सावकर सर (वाठार स्टेशन), अधाटे सर (चऱ्होली), माधवी मदने, राजश्री फापले, धम्मशिला कांबळे, अर्चना पवार, पल्लवी भावसार, ज्योती तांदळे, वैशाली जाधव, हेड मिस चंदा आतकरी, पल्लवी इंदा पवार, रोहिणी पाटील, शिल्पा सूर्यवंशी सुप्रिया पिसे, मनीषा फुलसुंदर, मंजिरी मुसळे, अश्विनी डंबाळ, अश्विनी फाळके, अर्चना कदम, डी एम आर सर, चांडक सर इत्यादींना आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
****
***
***