Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

PCMC : बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. (PCMC)

यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, आयक्युएसी समन्वयक डॉ. अर्जुन डोके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य मा. संतोष ढोरे, मा. संदेश नवले, मा. प्रतिक नवले, ह.भ.प. हिरामण महाराज देवकर, ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख लेफ्ट. डॉ. विठ्ठल नाईकवाडी, शारिरीक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांची उपस्थिती होती. (PCMC)

प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी उपस्थितींना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत ध्वज प्रतिज्ञा दिली.

याप्रसंगी आपल्या शुभेच्छापर संदेशात माजी महापौर मा. माई ढोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. अतुल शितोळे यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने पिंपरी – चिंचवड परिसरात विविध स्वच्छता, आरोग्य, शैक्षणिक व पर्यावरण पूरक उपक्रमात सक्रिय सहभागाचा आवर्जून उल्लेख करत महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतिक नवले यांनी महाविद्यालयाला पसायदान असलेली शिला भेट दिली. त्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमृता इनामदार यांनी केले तर यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी, समिती समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय