Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या (शिवतेज नगर) वतीने सैनिकांना रक्षाबंधन

PCMC : श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या (शिवतेज नगर) वतीने सैनिकांना रक्षाबंधन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आज रक्षाबंधनाचा सण असल्याने शिवतेज नगर श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांनी येथील देहूरोड येथील संरक्षण खात्याच्या 29 F.A.D. या डेपो मध्ये जाऊन संरक्षण खात्याचे अधिकारी व जवान यांना राख्या बांधण्यात आल्या. (PCMC)

मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्य दलातील अधिकारी व जवान देश सेवेसाठी आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर असतात. अशावेळी आपल्या कुटुंबीयांबरोबर त्यांना कोणतेही सण साजरे करता येत नाही.

आज रक्षाबंधन असल्याने, देशाचे रक्षण करणारे सैन्य दलातील अधिकारी व जवान यांना श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या. असे महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सारिका रिकामे यांनी सांगितले. यावेळी लेफ्टनंट कर्नल पोनाप्पा हे देखील राखी बांधण्यासाठी उपस्थित होते.

सारिका रिकामे यांनी महिला मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. सदर उपक्रमासाठी क्षमा काळे, नीलिमा भंगाळे, मोहिनी शिराळकर, सविता राणे, सुनिता वायाळ, गीतांजली पाटील, स्मिता शिरसाट, रीना शिंदे उपस्थित होत्या. (PCMC)

सर्व जवानांनी आपल्या बहिणी विषयी आदर व्यक्त केला. त्याचबरोबर या डेपोमध्ये महिला भगिनींसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल महिला मंडळाची देखील त्यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय